गोपनीयता धोरण

आम्ही काहीही गोळा करत नाही

लागू तारीख: १६ ऑक्टोबर २०२६ · ॲप: अक्षरपाखरू (AksharPakharu), पॅकेज in.aksharpakharu.app

हे धोरणाचं मराठी रूप आहे. काही फरक जाणवला तर इंग्रजी आवृत्ती अधिकृत मानावी.

अक्षरपाखरू हे मुलांसाठीचं शिक्षणाचं ॲप आहे. ते पूर्णपणे फोनवरच चालतं: खातं नाही, जाहिराती नाहीत, विश्लेषण (analytics) नाही, मागोवा नाही, ॲपमध्ये खरेदी नाही — आणि ते कुठेही कोणतीही माहिती पाठवत नाही.

ॲप काय साठवतं, आणि कुठे

हे सगळं फक्त तुमच्या फोनमध्ये साठवलं जातं. ते कधीही कुठे पाठवलं जात नाही, आणि ते कोणीही — आम्हीसुद्धा — पाहू शकत नाही.

ॲप काय करत नाही

प्रगती पाठवणं (फक्त तुम्ही ठरवलं तर)

पालक विभागात “प्रगती पाठवा” बटण आहे. पालकांनी ते दाबलं तरच फोनचा स्वतःचा “शेअर” पर्याय उघडतो, त्यात मुलाच्या प्रगतीचा मजकूर असतो, आणि तो कुठे पाठवायचा ते पालक ठरवतात (उदा. स्वतःलाच). पालकांनी असं केल्याशिवाय काहीही पाठवलं जात नाही.

मुलं

हे ॲप ४ ते ८ वर्षांच्या मुलांसाठी, पालकांसोबत वापरण्यासाठी बनवलं आहे. ते कोणतीही वैयक्तिक माहिती गोळा करत नसल्याने आमच्याकडे मागायला, दुरुस्त करायला किंवा काढायला काहीच नसतं. प्रोफाइल बनवणं आणि प्रगती पुसणं हे पालक विभागात होतं, आणि तो विभाग मोठ्यांसाठीच्या प्रश्नामागे आहे.

माहिती पुसणं

पालक विभाग → पुन्हा सुरुवात वापरून प्रगती पुसता येते; एखादं प्रोफाइल पालक विभागातूनच काढता येतं. ॲप अनइन्स्टॉल केलं की त्याने साठवलेलं सगळं जातं. फोनच्या सेटिंगमधून ॲपचा डेटा पुसला तरी तेच होतं.

ही वेबसाइट

ही वेबसाइट कुकीज किंवा विश्लेषण वापरत नाही. तिचे फॉन्ट Google Fonts वरून येतात.

बदल

हे धोरण कधी बदललं तर नवी आवृत्ती नव्या लागू तारखेसह याच पानावर दिली जाईल.

संपर्क

काही प्रश्न? लिहा: hello@abhijitvaidya.in